Kapil Sibal Accuses Jaitley of ’Big Talk’ on Inflation


Outlook

Write Comment     |     E-Mail To a Friend     |     Facebook     |     Twitter     |     Print


Launching a scathing attack on the Centre’s claim of arresting inflation, Congress leader Kapil Sibal today accused Finance Minister Arun Jaitley of indulging in "big talk" and sought to know if he had ever visited a market to know about the situation.

Punching holes in its claim of achievements, Sibal also took a few potshots at the government seizing on the slogans coined by the ruling dispensation to promote its image.

Questioning Jaitley’s statement that inflation had been brought under control since Narendra Modi became Prime Minister a year back, Sibal told reporters here that the finance minister was indulging in "big talk".

"Badi badi baatein karte hain Jaitley sahab. He says they have controlled inflation," the former union minister said.

"I would like to ask Jaitley: Have you been near the first floor of the North Block? Have you been to the market? What will a person who sits in North Block know about market," Sibal said.

They have given the slogan of "saal ek, kaam anek’ but in reality, it is "saal ek, baatein anek", Sibal said.

"All the work they claim to have done is in the air (kaam sab hawa mein hai). We don’t see that work on ground. Do you see it," he added.

"In last one year, Modi was on foreign tour for 53 days and was touring India for 48 days. No Prime Minister had criticised India while on foreign tour but Modi did that," Sibal said.

Their slogan is of Congress-free India but this will never be a reality, Sibal claimed.

"They promised toll-free Maharashtra but this has not been done," he said.

प्रसिद्धी पत्रक क्र. 1: बाजारात न फिरकणा-या जेटलींना महागाई कशी कळणार? माजी केंद्रीय मंत्री श्री कपिल सिब्बल यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

प्रसिद्धी पत्रक क्र. 2: वसई-विरार मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

प्रसिद्धी पत्रक क्र. 1

बाजारात न फिरकणा-या जेटलींना महागाई कशी कळणार?

माजी केंद्रीय मंत्री श्री कपिल सिब्बल यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

मुंबई, दि. 23 मे 2015:

मोदी सरकारचे अर्थमंत्री श्री अरूण जेटली महागाई कमी झाल्याचा दावा करतात. परंतु, मंत्री झाल्यापासून ते कधी बाजारात गेलेलेच नाहीत. दाळी, दूध, अंडी, भाजीपाला, कांदे, टमाटे, औषधे आदी सर्वच वस्तू महागल्या आहेत. बाजारात न फिरकणा-या जेटलींना महगाई कशी कळणार, असे टीकास्त्र माजी केंद्रीय मंत्री श्री कपिल सिब्बल यांनी सोडले आहे.

येथील नरिमन पॉइंटस्थित प्रदेश काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला ते संबोधित करीत होते. याप्रसंगी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध दाव्यांचा समाचार घेतला. मोदी सरकारला ‘अच्छे दिन’ आणता आलेले नाहीत. त्यांनी लोकांना किमान ‘सच्चे दिन’ तरी दाखवायला हवे होते. खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करायला नको होती, असे श्री सिब्बल म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी मंत्री श्री नसीम खान, श्री सुरेश शेट्टी, प्रवक्ते आ.श्री अनंत गाडगीळ, डॉ. राजू वाघमारे, श्री अल-नासिर झकेरिया आदी उपस्थित होते.

नामवंत विधीज्ञ श्री सिब्बल पुढे म्हणाले की, गेल्या वर्षभरात पंतप्रधानांनी विदेश दौ-यांवर 53 दिवस खर्ची घातले असून, तुलनेत भारतांतर्गत दौ-यांसाठी त्यांनी केवळ 48 दिवस दिले. त्यातल्या त्यात त्यांनी विदेशात जाऊन भारताची केवळ निंदा-नालस्तीच केली. ते पंतप्रधान होण्यापूर्वी भारतीयांना भारतीय असल्याची लाज वाटत होती, असे संतापजनक विधान त्यांनी अलिकडेच केले. जगभरात ते भारताचे पंतप्रधान म्हणून जातात; भाजपचे नेते म्हणून नाही, हे त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. मंगोलियाला 1 बिलियन डॉलर्सची मदत जाहीर करणारे मोदी भारतातील आत्महत्या करणा-या शेतक-यांप्रती साधी सहानुभूती तरी बाळगतात का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

मोदी सरकार नुसते घोषणाबाज असल्याची टीका श्री सिब्बल यांनी केली. मोदींनी काँग्रेसमुक्त भारताच्या वल्गना करू नयेत. त्यांचे हे स्वप्न कदापिही पूर्ण होणार नाही. त्याऐवजी भाजपने केलेली टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा खरी कशी ठरेल, यावर त्यांनी लक्ष केंद्रीत करावे. सत्तेत येताच शेतीमालाच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये 50 टक्के वाढ करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मागील वर्षभरात शेतक-यांना 10 टक्के तरी वाढीव रक्कम मिळाली का, हे त्यांनी तपासले. जन-धन योजनेतील 8 कोटी खात्यांमधील शिल्लक शून्य रूपये आहे. बिनाशिलकीची ही खाती कार्यान्वयीत ठेवण्यासाठी केंद्र सरकार वर्षाला सुमारे 16 हजार कोटी रूपये खर्च करते. मात्र, मरणाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतक-यांना मदत द्यायला सरकारकडे पैसा का नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.

गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 43 टक्क्यांनी कमी झाल्या. मात्र, भारतातील पेट्रोल व डिझेलच्या ग्राहकांना केवळ 14 टक्क्यांचाच लाभ देण्यात आला. सामान्य ग्राहकांच्या खिशातील उरलेला 29 टक्के नफा मोदी सरकारने आपल्या तिजोरीत जमा केल्याचे श्री कपिल सिब्बल यांनी आकडेवारीनिशी सांगितले.

भारतात उद्योगासाठी, गुंतवणुकीसाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जातो. परंतु, प्रत्यक्षात या सरकारच्या पहिल्या वर्षात देशातील 2941 प्रमुख उद्योगांच्या नफ्यात तब्बल 16 टक्क्यांनी घट झाली आहे. ही बाब उद्योगासाठी पोषक नक्कीच म्हणता येणार नाही. गुंतवणूक वाढवायची असेल तर उद्योगांना होणारा पतपुरवठा वाढविण्याची गरज असते. परंतु, मोदी सरकारने त्यात कपात केली आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूक करण्यास कंपन्या अनुत्सूक होत असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री श्री कपिल सिब्बल यांनी केला.

मोदी सरकारने देशातील भ्रष्टाचार कमी करण्याचा आव आणला. प्रत्यक्षात त्यांनी भ्रष्टाचार उघडकीस आणणा-या माहिती अधिकार यंत्रणेची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. मागील 8 महिन्यांपासून देशाला माहिती आयुक्त नाहीत. आता तर या विभागाला सचिव देखील राहिलेला नाही. माहिती मागणारे 39 हजार अर्ज सध्या प्रलंबित आहेत. 13 हजार अपिल सुनावणीविनाच पडून आहेत. लोकांना माहितीच द्यायची नाही म्हणजे भ्रष्टाचार बाहेर पडणार नाही, अशी मोदी सरकारची रणनिती असावी, असे श्री सिब्बल म्हणाले.

मोदी सरकार खोटारडे असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस सत्तेत असताना भाजपने जीएसटीला विरोध केला, विमा विधेयकाला विरोध केला. आता सत्तेत येताच त्यांनी याच विधेयकांना अनुकूल भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नांदेडला भाषण करताना श्री नरेंद्र मोदी यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना संसदेत येऊ देणार नाही, अशी घोषणा केली. कोणी आलेच तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवू, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात केंद्र सरकारमधील 65 पैकी 21 मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करायला मोदी सरकार तयार नाही.

काँग्रेस गोंधळ घालते म्हणून संसदेत कामकाज होत नाही, असा आरोप केंद्र सरकार करते. परंतु, भाजप विरोधात असताना राज्यसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते श्री अरूण जेटली यांनी संसदेचे कामकाज बंद पाडणे हीच आमची संसदीय रणनिती असल्याचे विधान केले होते. संसदेच्या कामकाजाप्रती अशा पद्धतीने विचार करणा-यांनी काँग्रेसकडे बोट दाखवू नये, असे श्री सिब्बल म्हणाले. विरोधात असताना लोकपालच्या मुद्यावर भाजपने प्रचंड गोंधळ घातला होता. मोदींच्या कार्यकाळात लोकपाल हरवलेत तरी कुठे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. ‘जो वर जातो, तो खाली येणारच’ हा न्यूटनचा नियम मोदींनाही लागू आहे. किंबहुना पुढील काळात त्याला मोदी नियमच म्हटले जाईल, असाही टोला त्यांनी लगावला.

………

प्रसिद्धी पत्रक क्र. 2

वसई-विरार मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई, दि. 23 मे 2015:

वसई-विरार महानगर पालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या या यादीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.श्री अशोक चव्हाण, वरिष्ठ नेते श्री ऑस्कर फर्नांडिस, विरोधी पक्षनेते श्री राधाकृष्ण विखे पाटील, आ.श्री माणिकराव ठाकरे, श्री पृथ्वीराज चव्हाण, श्री नारायण राणे, डॉ. पतंगराव कदम, श्री बाळासाहेब थोरात, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री संजय निरूपम, श्री नसीम खान, खा.श्री हुसैन दलवाई, आ.श्रीमती वर्षा गायकवाड, श्री राजेंद्र गावित, श्री दामू शिंगडा, आ.श्री जोगेंद्र कवाडे, श्रीमती जेनेट डिसुझा, श्री राजेश शर्मा, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती कमलताई व्यवहारे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री विश्वजीत कदम, श्रीमती कुनिका सदानंद यांचा समावेश आहे.

Write your Comments on this Article
Your Name
Native Place / Place of Residence
Your E-mail
Your Comment   You have characters left.
Security Validation
Enter the characters in the image above
    
Disclaimer: Please write your correct name and email address. Kindly do not post any personal, abusive, defamatory, infringing, obscene, indecent, discriminatory or unlawful or similar comments. Kemmannu.com will not be responsible for any defamatory message posted under this article.
Please note that under 66A of the IT Act, sending offensive or menacing messages through electronic communication service and sending false messages to cheat, mislead or deceive people or to cause annoyance to them is punishable. It is obligatory on kemmannu.com to provide the IP address and other details of senders of such comments, to the authority concerned upon request. Hence, sending offensive comments using kemmannu.com will be purely at your own risk, and in no way will Kemmannu.com be held responsible.
Similarly, Kemmannu.com reserves the right to edit / block / delete the messages without notice any content received from readers.




Udupi, Santhekatte Junction: Snap protest over inc
View More

Final Journey of Judith Lewis (91 years) | LIVE From KallianpurFinal Journey of Judith Lewis (91 years) | LIVE From Kallianpur
Rozaricho Gaanch April, 2024 - Ester issueRozaricho Gaanch April, 2024 - Ester issue
Final Journey Of Theresa D’Souza (79 years) | LIVE From Kemmannu | Udupi |Final Journey Of Theresa D’Souza (79 years) | LIVE From Kemmannu | Udupi |
Invest Smart and Earn Big!

Creating a World of Peaceful Stay!

For the Future Perfect Life that you Deserve! Contact : Rohan Corporation, Mangalore.Invest Smart and Earn Big! <P>Creating a World of Peaceful Stay! <P>For the Future Perfect Life that you Deserve! Contact : Rohan Corporation, Mangalore.


Final Journey Of Joe Victor Lewis (46 years) | LIVE From Kemmannu | Organ Donor | Udupi |Final Journey Of Joe Victor Lewis (46 years) | LIVE From Kemmannu | Organ Donor | Udupi |
Milagres Cathedral, Kallianpur, Udupi - Parish Bulletin - Feb 2024 IssueMilagres Cathedral, Kallianpur, Udupi - Parish Bulletin - Feb 2024 Issue
Way Of Cross on Good Friday 2024 | Live From | St. Theresa’s Church, Kemmannu, Udupi | LIVEWay Of Cross on Good Friday 2024 | Live From | St. Theresa’s Church, Kemmannu, Udupi | LIVE
Good Friday 2024 | St. Theresa’s Church, Kemmannu | LIVE | UdupiWay Of Cross on Good Friday 2024 | Live From | St. Theresa’s Church, Kemmannu, Udupi | LIVE
2 BHK Flat for sale on the 6th floor of Eden Heritage, Santhekatte, Kallianpur, Udupi2 BHK Flat for sale on the 6th floor of Eden Heritage,  Santhekatte, Kallianpur, Udupi.
Maundy Thursday 2024 | LIVE From St. Theresa’s Church, Kemmannu | Udupi |Maundy Thursday 2024 | LIVE From St. Theresa’s Church, Kemmannu | Udupi |
Kemmennu for sale 1 BHK 628 sqft, Air Conditioned flatKemmennu for sale 1 BHK 628 sqft, Air Conditioned  flat
Symphony98 Releases Soul-Stirring Rendition of Lenten Hymn "Khursa Thain"Symphony98 Releases Soul-Stirring Rendition of Lenten Hymn
Palm Sunday 2024 at St. Theresa’s Church, Kemmannu | LIVEPalm Sunday 2024 at St. Theresa’s Church, Kemmannu | LIVE
Final Journey of Patrick Oliveira (83 years) || LIVE From KemmannuFinal Journey of Patrick Oliveira (83 years) || LIVE From Kemmannu
Carmel School Science Exhibition Day || Kmmannu ChannelCarmel School Science Exhibition Day || Kmmannu Channel
Final Journey of Prakash Crasta | LIVE From Kemmannu || Kemmannu ChannelFinal Journey of Prakash Crasta | LIVE From Kemmannu || Kemmannu Channel
ಪ್ರಗತಿ ಮಹಿಳಾ ಮಹಾ ಸಂಘ | ಸ್ತ್ರೀಯಾಂಚ್ಯಾ ದಿಸಾಚೊ ಸಂಭ್ರಮ್ 2024 || ಸಾಸ್ತಾನ್ ಘಟಕ್ಪ್ರಗತಿ ಮಹಿಳಾ ಮಹಾ ಸಂಘ | ಸ್ತ್ರೀಯಾಂಚ್ಯಾ ದಿಸಾಚೊ ಸಂಭ್ರಮ್ 2024 || ಸಾಸ್ತಾನ್ ಘಟಕ್
Valentine’s Day Special❤️||Multi-lingual Covers || Symphony98 From KemmannuValentine’s Day Special❤️||Multi-lingual Covers || Symphony98 From Kemmannu
Rozaricho Gaanch December 2023 issue, Mount Rosary Church Santhekatte Kallianpur, UdupiRozaricho Gaanch December 2023 issue, Mount Rosary Church Santhekatte Kallianpur, Udupi
An Ernest Appeal From Milagres Cathedral, Kallianpur, Diocese of UdupiAn Ernest Appeal From Milagres Cathedral, Kallianpur, Diocese of Udupi
Diocese of Udupi - Uzvd Decennial Special IssueDiocese of Udupi - Uzvd Decennial Special Issue
Final Journey Of Canute Pinto (52 years) | LIVE From Mount Rosary Church | Kallianpura | UdupiFinal Journey Of Canute Pinto (52 years) | LIVE From Mount Rosary Church | Kallianpura | Udupi
Earth Angels Anniversary | Comedy Show 2024 | Live From St. Theresa’s Church | Kemmannu | UdupiEarth Angels Anniversary | Comedy Show 2024 | Live From St. Theresa’s Church | Kemmannu | Udupi
Kemmannu Cricket Match 2024 | LIVE from KemmannuKemmannu Cricket Match 2024 | LIVE from Kemmannu
Naturya - Taste of Namma Udupi - Order NOWNaturya - Taste of Namma Udupi - Order NOW
New Management takes over Bannur Mutton, Santhekatte, Kallianpur. Visit us and feel the difference.New Management takes over Bannur Mutton, Santhekatte, Kallianpur. Visit us and feel the difference.
Focus Studio, Near Hotel Kidiyoor, UdupiFocus Studio, Near Hotel Kidiyoor, Udupi